जीवन त्यांना कळले हो...!

(वृत्तपत्र विक्रेता ते समाजसेवक - एक प्रेरणादायी प्रवास)

जीवनाचा खरा अर्थ गवसलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री. जीवन विठोबा भोसले. खेळण्याबागडण्याच्या वयातच त्यांनी व्यवसायासाठी म्हणून वृत्तपत्र हाती घेतले. मात्र पुढे हेच वृत्तपत्र त्यांचा ध्यास, त्यांचा श्वास बनले. गेली ३३ वर्षे आपल्या वृत्तपत्र व्यवसायाशी एकनिष्ठ राहून अनेक समाजोपयोगी उपक्रमही त्यांनी सुरू केले.

जनमानसांत वर्तमानपत्र वाचण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हस्ताक्षर आणि वर्तमानपत्र अशी अनोखी स्पर्धा त्यांनी घेतली. तसेच मराठी पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी गिरणगावात अल्प दरात मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले, ज्याला यशस्वी आणि उत्तम प्रतिसाद मिळाला.

शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ आणि लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या माध्यमातून वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करून दरवर्षी १००० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करून मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयांना ते मदतीचा हात देत आहेत. तसेच दरवर्षी ५०० पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, करिअर मार्गदर्शन आणि त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत.

अजून एक अनोखी संकल्पना सांगायची झाली तर गेली ६० वर्षां पेक्षा जास्त खानावळीची ही परंपरा आज ही या गिरणगावात चालू आहे. अतिशय माफक दरात अन्नदानासारखे पवित्र कार्य करत आपला प्रपंच, संसार नेटका करत मुलांचे शिक्षण, संसार गाडा चालवण्यासाठी कष्ट उपसणाऱ्या, राबणाऱ्या हातांचा पण काहीशा दुर्लक्षित असणाऱ्या माऊलींचा नवदुंर्गाचा सन्मान करण्यात आला आणि दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त आपआपल्या क्षेत्रात नावलौकिक झालेल्या महिलांचा सन्मान करण्यात येतो.

समाज आणि मानव यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे वर्तमानपत्र. या वर्तमानपत्राची विश्वासार्हता टिकून राहावी यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थी आणि पालकांसाठी मराठी वर्तमानपत्राचे सामूहिक वाचन हा अनोखा उपक्रम त्यांनी यावर्षी पासून सुरू केला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

महत्वाचं म्हणजे करोना काळात अनेक वाचकांची वृत्तपत्र वाचनाची तीव्र इच्छा लक्षात घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून वर्तमानपत्र विक्रीचे स्टॉल त्यांनी सुरू ठेवले आणि वृत्तपत्र व्यवसाय टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य केले. पुढेही करोनाच्या विळख्यात ४२ दिवस रुग्णालयात मृत्युशी झुंज देत असताना, हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी यासारख्या प्रसंगांना सामोरं जाऊन पुन्हा त्याच जिद्दीने वृत्तपत्र व्यवसायाला भरारी देण्याचा प्रयत्न केला.

नकळत्या वयातच आलेली परिस्थितीची जाण आणि स्वीकारलेली जबाबदारी यातूनच त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत गेली. उपजतच असलेली दयाळू वृत्ती, 'समाज सेवा हीच ईश्वर सेवा' हे अवलंबलेले तत्व आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहता 'जीवन त्यांना कळले हो...' या ओळी त्यांच्यासाठी सर्वार्थाने सार्थ ठरतात...!!

दरवर्षी १००० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करून मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयांना दिलेला मदतीचा हाथ...!

दरवर्षी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, करिअर मार्गदर्शन आणि त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न…

जागर आदिशक्तिचा सन्मान नवदुर्गांचा ह्या कार्यक्रमा अंतर्गत

महिलांचा सन्मान........

पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन ...

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन........

संपर्क

जर तुम्ही आमच्यासोबत समाजकार्य करण्यासाठी उत्सुक असाल तर बाजूचा फॉर्म भरून आमच्याशी मेल द्वारे संपर्क साधु शकता.

अथवा मोबाईल नंबर किंवा सोशल मिडिया लिंक वरून संपर्क साधु शकता.